(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा जिल्हा नियोजन समितीचेवतीने पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील विविध नद्यांचे गाळ काढण्यासाठी निधी मंजुर केलेला असून पैकी पावस गॊतमी नदी डिझेल करिता ७.६१,३०२/- मजगाव नदी ७,५८,८३१/- व पोमेंडी खुर्द महालक्ष्मीचा पऱ्या ९,६२,२१४/- मंजूर आहेत. नाम फाउंडेशनची चिपळूण चिरणी मालदोली येथील जैवविविधता जोपासण्याचे ध्येय समोर ठेवून तांत्रिकद्रुष्टीने परिपूर्ण गाळ काढण्याची पद्धत पाहून पालकमंत्री उदय सामंत यांनी सदरहु तीन गावातील गाळ काढण्याचे काम नाम फाउंडेशन यांना करावयास सांगितले आहे.
या कामासाठी नामफाउंडेशन च्या मशिनरी या कार्यस्थळांवर दाखल होत आहेत. या तिनही कामाचे रविवार दिनांक ३० एप्रिल २०२३ सकाळी १०.३० वाजता पावस गणेश मंदिर येथे सुप्रसिध्द अभिनेते नाम फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते होत आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, जलसंपदा अधिक्षक अभियंता सॊ वैशाली नारकर, कार्यकारी अभियंता जगदिश पाटील यांत्रिकीचे कार्यकारी अभियंता जावेद काझी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता पावस गावच्या सरपंच चेतना सामंत, उपसरपंच शिंदे ,तसेच नाम फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत.