गेल्या सात वर्षात किंबूहूना कै मधू दंडवते यांचे नंतर रत्नागिरी – सिंधुदूर्ग जिल्ह्यात म्हणजेच लोकसभा मतदार संघात एकही रचनात्मक काम , ऊद्योग कोठेही दिसत नाही . साधे चौपदरी रस्त्याच्या प्रकल्प बाधितांचे प्रश्न अद्याप पूर्ण पणे सुटलेले नाहीत कित्तेक केसेस अद्याप लवादा मध्ये पडून आहेत. खासदारांचा कार्यक्रम हा टपली मारणे , एकमेकावर टिका करणे आणि स्वतःचे अकार्यक्षम नेतृत्व लपविणे असेच दिसते . त्यामुळे गेल्या अठ्ठावीस तीस वर्ष नेतृत्व ज्यांच्या कडे होते ते बदलण्याची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन लांजा युवक काँग्रेसचे अनिकेत गांधी यांनी केले.
कॉंग्रेसकडून शिवसेनेला घरचा आहेर : महाविकास आघाडीतील खदखद चव्हाट्यावर…
ते पुढे म्हणाले की मा . खासदारांची आपल्या खासदार निधीतून पाकाडया, डांबरीकरण या पलिकडे त्यांची मजलच गेली नाही. ना कोणता ऊद्योग, ना शेतीची भरभराट , ना नोकरी फक्त महाराष्ट्राच्या आमच्या दैवताचा जयघोष करून आमच्या तरूण पिढीला भुलवून ठेवले आहे. आम्ही या पुढे महाराष्ट्राच्या दैवताच्या नावाने मते मागुन खुद्द छत्रपतींचा अवमान काँग्रेस करु देणार नाही हे काँग्रेसच्या वतीने जाहिर करीत आहोत असे अनिकेत गांधी यांनी सांगितले .
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. पण लोकसभा मतदार संघात सरकारच दिसत नाही त्यामुळे पुढची लोकसभेची निवडणूक काँग्रेसने लढवली पाहीजे असे गांधी यांनी सांगितले .