रत्नागिरी शहरासाठी अखंडित वीजपुरवठा राहण्याकरिता 220 किलोवॉट वाहिनीचे निवळी ते कुवारबाव दुपदरीकरण करण्याचे काम महापारेषण कंपनी लवकरच पूर्ण करणार आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरासाठी भविष्यात पावसाळी वातावरणात वीज पुरवठा खंडित झाल्यास तीन पर्याय राहणार आहेत.
सध्या पालगड (ता. मंडणगड), शिवणे (ता. गुहागर), ओणी (ता. राजापूर) आणि साडवली (ता. संगमेश्वर) ही चार नवीन विद्युत उपकेंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याने जिल्ह्यातील वीज पुरवठा विना खंडित सुरू राहील, अशी माहिती मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी दिली. पावसाळ्यात अखंडित पुरवठ्यासाठी आवश्यक सर्व मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश सर्व अधिकार्यांना दिले आहेत.