(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातील परटवणे येथे जुगार चालविणाऱ्या प्रौढावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय शांताराम गोवेकर (56, परटवणे रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
ही कारवाई सोमवार 12 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास करण्यात आल़ी. त्याच्याकडून पोलिसांनी अवैध जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केल़ी. संशयित आरोपी उदय गोवेकर याच्याविरूद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल़ा. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रवीण वीर करत आहेत.