(मुंबई)
रत्नागिरी येथुन नियमित प्रवासी विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्यास प्राधान्य देऊ तसेच महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या मागण्या व प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या पदाधिकार्यांसमवेत दिल्ली येथे संयुक्त बैठक करू अशी ग्वाही केंद्रीय विमानवाहतुक मंत्री नाम. ज्योतिरादित्य सिंधीया यांनी ललित गांधी यांना दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नाम. ज्योतिरादित्य सिंधीया यांची त्यांच्या कोल्हापूर दौर्यात भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या प्रश्नांसंबंधी निवेदन देऊन चर्चा केली त्या प्रसंगी ते बोलत होते.
विशेषतः रत्नागिरी विमानतळ प्रवासी सेवेसाठी कार्यान्वित करणे, नाशिक येथुन नवीन मार्गावर विमानसेवा सुरू करणे, जळगाव विमानसेवा सुरू करणे, औरंगाबाद पूणे हवाई सेवा, कोल्हापूर येथुन नवीन विमानसेवा मार्ग, अकोला, चिपी विमानतळाबाबतही चर्चा करण्यात आली.
शिर्डी विमानतळावरून कृषी उत्पादनांची वाहतुक वाढविण्यासाठी विशेष व्यवस्था, सर्व विमानतळावर कार्गो टर्मिनलची उभारणी या मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या.
सोलापूर विमानतळावरून नियमित प्रवासी सेवा सुरू करण्यासंबंधी असलेल्या अडचणी दुर करण्याची मागणीही ललित गांधी यांनी केली. तसेच यासाठी सोलापूर विकास मंच तर्फे गेले दिवस सुरू असलेल्या चक्री उपोषणाची माहीती देऊन या प्रश्नी तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी ललित गांधी यांनी केली.
केंद्रीय मंत्री नाम. ज्योतिरादित्य सिंधीया या संदर्भात नवी दिल्ली येथे चेंबरच्या पदाधिकार्यांसमवेत लवकरच संयुक्त बैठक आयोजित केली जाईल असे सांगितले.
यावेळी खासदार धनंजय महाडीक, समरजित घाटगे, सतीश माने, प्रकाश केसरकर, दर्शन गांधी आदी उपस्थित होते.
फोटो : केंद्रीय विमान वाहतुक मंत्री नाम. ज्योतिरादित्य सिंधीया यांना महाराष्ट्रातील विमानसेवा संबंधी निवेदन देऊन चर्चा करताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज चे अध्यक्ष ललित गांधी