वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी तालुक्याची टीआरपी येथील अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी रविवार दि. २८ ऑगस्ट रोजी वंचितच्या रत्नागिरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा प्रभारी संतोष खोपकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीत रत्नागिरी तालुक्यामधील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वाढीसाठी तसेच आगामी होणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या निवडणूकीसंबंधीत सविस्तर चर्चा करण्यात आली. वंचित बहुजन आघाडी सदस्य मोहिम राबविणे, पक्षबांधणी – विस्तार – व संघटन याचबरोबर पक्षाला बळकटी प्राप्त करण्याच्या हेतूने आपल्याला जे जे सकारात्मक पाऊले उचलता येईल संघटितरीत्या कार्य कसे करता येईल ते सर्व पदाधिकाऱ्यांनी करावे अशा मार्गदर्शक सुचना जिल्हा प्रभारी संतोष खोपकर यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनंत सावंत, तालुकाध्यक्ष रविंद्र कोकरे, तालुका महासचिव मुकुंद सावंत, महेंद्र पवार यांच्यासह इतर कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !