(रत्नागिरी)
महाराष्ट्राला लाभलेल्या 720 कि.मी लांबीच्या किनारपट्टीवर समृद्ध जैवविविधता आहे. मुंबईसह, रत्नागिरी, सिंधुदूर्ग कोकण किनारपट्टीवर ‘इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन मोठा अधिवास आहे. या डॉल्फिनचे दर्शन पर्यटकांसह, अभ्यासकांनाही व्हावे तसेच बदलत्या वातावरणामुळे इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिनच्या अधिवासावर, त्यांचा भ्रमणमार्ग आणि अन्नसेवनाच्या पद्धतीवर परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात येणार आहे. त्यासाठी या किनारपट्टीतील डॉल्फिनची संख्या किती, त्यांच्या अधिवासाचा वावर याचा सविस्तर अभ्यास राज्याच्या कांदळवन कक्षामार्फत हाती घेण्यात येणार आहे.