काल रत्नागिरी शहरातील मिस्त्री हायस्कूल येथे लसीकरण कार्यक्रमात उडालेल्या गोंधळास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर या जबाबदार असल्याचा आरोप रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी केला आहे. याबाबत आज त्यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
ते म्हणाले कि जर नागरिकांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहचवली असती तर लसीकरणाबाबत कालची घटना घडली नसती. लसीकरणाची जबाबदारी नगरपालिकेने घ्यावी असे पत्र केवळ whatsapp वर पाहण्यात आले होते. मात्र ते पत्र आजतागायत नगरपालिकेला मिळाले नाही. नगरपालिकेवर ही जबादारी सोपवली असती तर हि घटना घडली नसती. आदल्या दिवशी आरोग्य विभागाने नगरपालिकेला कळवले तर नगरपालिका अतिशय चांगल्या पद्धतीने लसीकरणाचे नियोजन करेल.
आरोग्य सभापती, नगरपालिकेचा कर्मचारीवर्ग, सर्व नगरसेवक याची जबाबदारी घ्यायला सक्षम आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी कुणालाच विश्वासात घेत नसल्याने हा प्रकार वेळोवेळी घडतोय. प्रभागानुसार लसीकरण केल्यास नागरिकांना कोणताही त्रास न होता लस देता येईल असे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सांगितले.