(रत्नागिरी / प्रतिनिधी )
शहरालगतच्या मिरजोळे पाटीलवाडी येथे एका 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. तरुणांच्या वाढत्या आत्महत्यांच्या प्रकाराने रत्नागिरीत हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, मिरजोळे पाटीलवाडी येथे आज सकाळी आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत एक तरुण आढलून आला. हा तरुण जयगड येथील एका कंपनीत कामाला आहे. तो आपली ड्युटी संपवून सकाळी जात होता. मात्र त्यानंतर तो पाटील वाडी येथे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ व्यक्त होत आहे.