(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी पोलीस दलातर्फे स्वतंत्र यु ट्यूब चॅनेल ‘रत्नागिरी पोलीस’चे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी करण्यात आले.
या यु ट्युब चॅनेलमुळे जनजागृती होण्यास मदत होणार असून विविध गुन्ह्यामध्ये नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महिलांना येणाऱ्या अडचणी तसेच वृद्ध, मुले यांच्यासाठी प्रबोधनात्मक जनजागृती केली जाणार असून यु ट्यूबच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा भीतीमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तसेच याद्वारे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी होणाऱ्या चोऱ्या आणि जनतेने घ्यावयाची काळजी याचेही प्रबोधन केले जाणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, परीविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक डॉ. समाधान पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पो.नि. निशा जाधव, सहा.पो.नि. नितीन पुसाळकर, पोलीस निरीक्षक वैशाली अडकूर तसेच अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.