(रत्नागिरी / प्रतिनिधी )
भारताच्या स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा पोलिस दलातर्फे स्वातंत्र्य सैनिक आणि सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रध्वजांचे वाटप करण्यात आले. देशाला दिलेल्या भरीव योगदानाचे ऋण व्यक्त करण्याच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्याबाबत सुचित करण्यात आले होते.
जिल्हा अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्ह्यात वास्तव्यास असलेले स्वातंत्र्य सैनिक तसेच जिल्हा पोलिस दलातील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांना त्यांच्या राहत्या घरी जाऊन रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रध्वज वाटप केल्यामुळे स्वातंत्र्य सैनिक, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.