( रत्नागिरी / प्रतिनिधी )
मागील दोन महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या सायबर पोलीस ठाणे आणि तांत्रिक विश्लेषण शाखेने रत्नागिरी जिल्ह्यातून हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाइल्स ( भ्रमणध्वनी ) शोधून काढले. या शोध प्रक्रियेत रत्नागिरी पोलिसांनी एकूण ८० मोबाईल हॅण्डसेट जप्त केले. जप्त करण्यात आलेले एकूण ८० मोबाईल हॅण्डसेट ( भ्रमणध्वनी ) सर्व मुळमालकांना परत करण्यात आले आहेत. पोलिसांच्या तत्पर कारवाईने नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी उपस्थितशी संवाद साधताना कोणतीही सापडलेली वस्तु स्वतःकडे ठेवणे ही एक सामाजिक अप्रवृत्ती असून यामध्ये सामाजिक प्रबोधनाची आवश्यकता आहे , असे सांगितले . यावेळी पोलीस अधिकारी , अंमलदार यांची उपस्थिती होती .