[ रत्नागिरी / प्रतिनिधी ]
सामाजिक कार्य करणाऱ्या जिव्हाळा सेवाभावी संस्था खेडशी या संस्थेला स्वच्छता चैम्पियन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या संस्थेने विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. गेले तीन वर्ष आरोग्य, शेती, पर्यावरण, शिक्षण महिला व समाजातील गरीब-गरजू मुलांसाठी संस्थेने काम केले आहे. याचीच दखल घेऊन रत्नागिरी पालिकेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभीयान ३.० अंतर्गत केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल जिव्हाळा सेवा संस्थेला प्रथम क्रमांक देवून स्वच्छता चॅम्पियन म्हणून सन्मानित करण्यात आले.
रत्नागिरी पालिकेच्या संत गाडगेबाबा महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला. यावेळी हा सन्मान अध्यक्ष श्री. गोपीनाथ शिवाजी सावंत सचिव सौ. सायली गोपीनाथ साबेल व सदस्य सौ. निकिता जनार्दन कांबळे यांनी स्विकारला. पालिका प्रशासक चाळके, माजी आरोग्य सभापती निमेश नायर तसेच इतर मान्यवरांचे हस्ते सदर पुरस्कार देण्यात आला.