(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील गणराज व एस. आर.के तायक्वांडो क्लबचे गायत्री यंशवत शेलार, समर्था बने, सई संदेश सांवत, अमेय अमोल सांवत या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली असून ते रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 32 वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर तायक्वांडो अजिंक्यपद तायक्वांडो स्पर्धा दि.26 ते 28 जानेवारी दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल जळगाव या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 600 खेळाडू सहभागी होणार आहेत.
सदर खेळाडूंना शुभेच्छा देताना जिल्हा विशेष कारागृहाचे अधिकारी ईनामदार, माजी उपनगराध्यक्ष श्री.राजन शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी गणराज व एस.आर.के तायक्वॉडो क्लबचे प्रशिक्षक शाहरुख शेख, प्रशांत मनोज मकवाना आदी मान्यवर उपस्थित होते.