रत्नागिरी : जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, आपल्याकडे अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. संगमेश्वर येथील आणखी दोन गावे कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यातील पॉसिटीव्हिटी दर कमी होत असून, त्यानुसार जिल्ह्यातील निर्बंध ठरविले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
संगमेश्वरमधील पांच गावात टेस्टिंग सुरु झाले असून, आतापर्यँत ६१०६ जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. त्यात १४१ जण पॉसिटीव्ह सापडले आहेत. जवळपास ८० टक्के टेस्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. या तालुक्यातील आणखी दोन गावे कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसात जिल्ह्याचा पॉसिटीव्हिटी दर ८ टक्क्यापर्यंत खाली आला आहे. हि बाब दिलासादायक असून, त्यानुसार जिल्ह्यातील निर्बंध ठरतील. मात्र नव्या स्ट्रेनचा परिणाम होणार नाही.