(रत्नागिरी / प्रतिनिधी)
ताणतणाव, नैराश्य, शुल्लक कारणावरुन वाद यामुळे रत्नागिरी जिल्हयात दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. 8 सप्टेंबर 2022 ते 10 नोव्हेंबर 2022 या दोन महिन्याच्या कालावधीत 22 आत्महत्या झाल्या आहेत. या आत्महत्यांमध्ये तरुणांचे सर्वाधिक प्रमाण आहे. यामध्ये केवळ रत्नागिरी तालुक्यातच 14 आत्महत्या झाल्या आहेत. तर 7 आत्महत्या खेड, गुहागर, दापोली या तालुक्यात झालेल्या आहेत. या 22 आत्महत्यांमध्ये 10 जण हे 20 ते 34 वयोगटातील आहेत. रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील काजल कृष्णा बेगडा (26) या विवाहीतेने पती रागवल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तशी नोंद पोलीस स्थानकात आहे.
8 सप्टेंबर पासून 10 नोव्हेंबर पर्यंत झालेल्या आत्महत्यांचा आढावा
1) दापोली : 8 सप्टेंबर 2022 रोजी : महेश भांबुरे (42, समर्थ मेडिकलचे मालक, दापोली) यांनी कीटकनाशक औषध प्राशन करुन जीवन संपवले.
2) रत्नागिरी : 8 सप्टेंबर 2022 रोजी : शांताराम भागोजी कोकरे (55, नाखरे धनगरवाडी, ता. रत्नागिरी) यांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली.
3) खेड : 9 सप्टेंबर 2022 रोजी : विशाल कृष्णा नायनाक (23, गुणदे, खेड) याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.
4) दापोली : 9 सप्टेंबर 2022 रोजी : सागर देसाई (50, दापोली) आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली.
5) खेड : 11 सप्टेंबर 2022 रोजी : ओंकार अजय भंडारे (27, भोस्ते वरचीवाडी, खेड) राहत्या घरी भालाला गळफास घेवून आत्महत्या केली.
6) रत्नागिरी : 24 सप्टेंबर 2022 रोजी : प्रणव कृष्णा सनगरे (24, टिके, भातडेवाडी) याने घरगुती कारणावरुन रत्नागिरी आरटीओ कार्यालयासमोरील रेल्वे रुळावर रेल्वे समोर झोकून देत आत्महत्या केली. त्याचे 3 महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. आत्महत्येचे कारण अस्पष्ट.
7) रत्नागिरी : 25 सप्टेंबर 2022 रोजी : राजेंद्र सावंत (22, वळके बौध्दवाडी, रत्नागिरी) या तरुणाने त्याच ठिकाणी म्हणजे रत्नागिरी आरटीओ कार्यालयासमोरील रेल्वे रुळावर रेल्वे समोर झोकून देत प्रणव सनगरेप्रमाणेच आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट.
8) रत्नागिरी : 29 सप्टेंबर 2022 रोजी : तन्वी घाणेकर (33, परटवणे, रत्नागिरी) भगवती बंदर येथे कपल पॉईंटवरुन आत्महत्या केली.
9) रत्नागिरी : 17 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 9.15 वा. : यश उमेश टाकळे (23, कुवारबाव, रत्नागिरी) तलावात आत्महत्या केली.
10) रत्नागिरी : 17 ऑक्टोबर 2022 रोजी (आत्महत्येचा प्रयत्न) : काजल कृष्णा बेगडा (26, साळवी स्टॉप, रत्नागिरी) घरगुती कारणातून आत्महत्येचा प्रयत्न.
11) रत्नागिरी : 21 ऑक्टोबर 2022 रोजी : साहिल विनायक मोरे ( 23, शिवलकरवाडी, जाकिमिर्या रत्नागिरी) साईभूमीनगर येथे मैत्रिणीच्या घरात फॅनला गळफास घेवून आत्महत्या. (प्रेयसीने लग्नास नकार दिल्यामुळे)
12) रत्नागिरी : 23 ऑक्टोबर 2022 रोजी : शमशाद शौकत मुकादम (56, कर्ला, रत्नागिरी) सायंकाळी 4 वा. घरातील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या.
13) रत्नागिरी : 25 ऑक्टोबर 2022 रोजी : जितेंद्र तुकाराम खाके (50, खालचीआळी, रत्नागिरी) सकाळी 11 वा. घरातील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या.
14) रत्नागिरी : 30 ऑक्टोबर 2022 रोजी (नवविवाहित जोडपे) : संदीप जयवंत गोताड (27, कोळीसरे,रत्नागिरी), पूजा संदीप गोताड (25, कोळीसरे, रत्नागिरी) या नवविवाहित जोडप्याने नायलॉन दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. 1 महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.
15) रत्नागिरी : 30 ऑक्टोबर 2022 रोजी : राहुल एकनाथ जांभळे (23, जयगड, रत्नागिरी) घरातील वाश्याला रात्री 9.30 वा. च्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली.
16) रत्नागिरी : 1 नोव्हेंबर 2022 रोजी : दत्ताराम यशवंत आंबेकर (35, भोके आंबेकरवाडी, रत्नागिरी)
17) खेड : 2 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री : जानू बयाजी पवार (97, वावेतर्फे नातू, बौध्दवाडी) वृध्देची आजाराला कंटाळून आत्महत्या.
18) रत्नागिरी : 6 नोव्हेंबर 2022 रोजी : अनिकेत जयराम चव्हाण (27, वरवडे, भंडारवाडी, रत्नागिरी) गळफास घेवून आत्महत्या.
19) गुहागर : 6 नोव्हेंबर 2022 रोजी : प्रतीक्षा कुशा तांडेल (23, वेलदूर, खारवीवाडी, साखरीआगर, गुहागर) हिने आजाराला कंंटाळून आत्महत्या.
20) खेड : 6 नोव्हेंबर 2022 रोजी : पल्लवी सिताराम मोरे (19, खेंड, ता. खेड) हिने सकाळी 9 वा. गळफास घेवून आत्महत्या.
21) खेड : 10 नोव्हेंबर 2022 रोजी : महेश भिवा मळेकर (32, वेरळ, प्रभूवाडी, खेड) याने राहत्या घरी भालाला गळफास घेवून आत्महत्या केली.
22) खेड : 10 नोव्हेंबर 2022 रोजी : मोहम्मद शरीफ अन्सारी (28, बिहार, सध्या खेड) याने रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली.
😢😢खूप चिंतेची बाब आहे…प्रत्येकाने यावर विचार करावा…का स्वतःचं जीवन संपवतात? सोन्यासारखा जीव , आपल्या मागे आई, वडील, बहीण, भाऊ आहेत त्यांचं काय होईल? याचा तरी विचार करायला पाहिजे…का स्वतःला अशी शिक्षा करून घेतात?…आणि हाच मार्ग का निवडतात? याव्यतिरिक्त अनेक मार्ग आहेत ज्यामुळे या अशा नैराश्य, ताणतणाव आणि इतर कारणांपासून आपण आपला जीवन सुखकर जगू शकतो याचा विचार आपल्या लहान भावंडांना,मित्रांना द्यायची गरज आहे…कारण आताची पिढी ही खूप सेन्सिटिव्ह झाली आहे, त्यांच्याकडे कोणतीही गोष्ट सहन करण्याची ताकद किंवा सहनशीलता राहिली नाही…
खूप वाईट वाटतं …या अशा घटना ऐकून…