(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यात दुबार मतदारांची संख्या तुलनेने कमी असल्याने अशा मतदारांची पडताळणी करून योग्य ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्याची संधी दिली जात आहे. जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडून वारंवार मतदार यादी अद्ययावत करण्यात येत असल्याने दुबार मतदारांची संख्या कमी झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मतदारांची एकूण संख्या १३ लाख ६० हजार ६०१ इतकी आहे. त्यात पुरूष मतदार ६ लाख ४१ हजार ८०८, महिला मतदार ६ लाख ८८ हजार ७८३ आहेत. निवडणूक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात दुबार मतदारांची संख्या फक्त ७१ आहे. प्रांत, तहसीलदार, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून वारंवार पडताळणी होत असल्याने दुबार मतदारांची संख्या कमी झाली आहे.
दुबार मतदार नोंद मिळाली तर त्वरित संबंधित मतदाराशी संपर्क साधून त्याचा सद्यस्थितीतील पत्ता ग्राह्य धरून अन्य ठिकाणची नोंद रद्द केली जात आहे.