(रत्नागिरी/प्रतिनिधी)
कामगार उपआयुक्त मुंबई यांनी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार आता रत्नागिरी जिल्ह्यात सर्व दुकानांवर मराठी भाषेत नामफलक लावण्यात येणार आहेत. ज्या आस्थापनांची व दुकानांची नोंद (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017 कलम 36 क (1) कलम 6 अन्वये नोंदणी झाली आहे, अशा सर्व आस्थापना व दुकानांना त्यांचा नामफलक हा देवनागरी भाषेत म्हणजे मराठीत असणे आवश्यक करण्यात आले आहे.
नामफलकावर मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक असेल तर चालणार आहे, मात्र नामफलकावर असलेला मराठी फॉन्ट हा इतर भाषेतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाही. तसेच जी आस्थापने व दुकाने मद्याचा व्यवसाय करतात, अशा दुकान व आस्थापनांचे नामफलक हे महान व्यक्ती व गडकिल्ले यांच्या नावावर ठेवता येणार नाही. यामुळे आता शहर व जिल्ह्यात दुकानांचे नामफलक मराठीत झळकणार आहेत.