(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची ९८४ पदे रिक्त असताना साडेतीनशे शिक्षकांनी आंतर जिल्हा बदलीसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाची चिंता वाढली आहे. जोपर्यंत शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या जात नाहीत. तोपर्यंत या शिक्षकांना कार्यमुक्त करु नये, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर जिल्ह्यातील उमेदवार शिक्षक म्हणून रुजू होतात व काही दिवस, काही महिने, काही वर्ष झाल्यानंतर ते आपल्या जिल्ह्यात बदली करून घेण्यासाठी इच्छूक असतात. अशा साडेतीनशे शिक्षकांनी रत्नागिरी जिल्ह्याबाहेर बदली व्हावी म्हणून प्रस्ताव दाखल केले आहेत. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने ९८४ पदे रिक्त असून जोपर्यंत ९४८ अधिक ३५० म्हणजेच १२९८ इतकी पदे भरल्याशिवाय या शिक्षकांची जिल्हा बदली करू नये याकडे रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या शिक्षकांना कार्यमुक्त करु नये, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.