( रत्नागिरी )
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २०७ नगर परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या दि. १० मार्च २०२२ रोजी सुरु असलेल्या टप्प्यांपासून निवडणुकांची कार्यवाही त्वरीत सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असून, यास अनुसरून प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप व हरकती पासून प्रभाग रचनेच्या अनुषंगाने सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि राजापूर या चार नगर परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया अखेर सुरु झाली आहे.
हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी १० मे २०२२ ( मंगळवार ) ते १४ मे २०२२ (शनिवार ) पर्यंत असून, दि. २३ मे २०२२ (सोमवार) पर्यंत प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देण्यात येणार आहे.
हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयुक्त यांचेकडे अहवाल पाठविणे दि. ३० मे २०२२ ( सोमवार ) पर्यंत, आणि दि. ०६ जून २०२२ अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणेत येणार आहे. तसेच अंतिम प्रभागरचना अधिसूचना दि. ७ जून २२ पर्यंत प्रसिद्ध करणेची आहे.