( रत्नागिरी )
रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. यातील काही रुग्णांवर ऑपरेशन करण्याची गरज असते. मात्र ऑपरेशन करण्यापूर्वी भूल देण्याची गरज असते. यासाठी भूलतज्ज्ञांची वानवा होती. मात्र आता जिल्हा शासकीय रुग्णालयात 2 भूलतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आल्याने आता रुग्णालयातील प्रश्न सुटला आहे. डॉ. भालाजी कदम आणि डॉ. विनोद चव्हाण हे दोन भूलतज्ज्ञ रुजू झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रक्रिया पार पडत असतात. बऱ्याच वेळा भूलतज्ज्ञ नाही म्हणून खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी लागत होती. मात्र, आता एकाचवेळी २ भूलतज्ज्ञ रुजू झाल्याने रुग्णालयाला मोठा दिलासा मिळाला आहे. डॉ. भालाजी कदम आणि डॉ. विनोद चव्हाण हे प्रत्यक्षात कामावर हजर झाले असून, यापुढे कोणत्याही रुग्णाची गैरसोय होणार नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांनी सांगितले.