रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात खोतकी करून एकाच ठिकाणी अनेक वर्षे नोकरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांनी बाहेरच्या तालुक्यांचा रस्ता दाखविला आहे. पोलीस दलातील एएसआय ते पोलीस हवालदार अशा मिळून ४६ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी काढले आहेत. गुरुवारी रात्री उशीरा जिल्हा पोलीस दलातील बदल्यांचे गॅझेट प्रसिद्ध झाले. अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्जाचा विचार करून आणि प्रत्यक्ष समुपदेशनाद्वारे बदल्या झाल्या आहेत. तसेच खोतकी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मंडणगडचा रस्तादेखील दाखविण्यात आला आहे.
या बदली आदेशानंतर तात्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी दिले आहेत. पोलिस दलातील बदली झालेल्या कर्मचाऱ्याचे मुळ ठिकाणी बदलीच्या ठिकाणाची यादी पुढीलप्रमाणे – पोहेकॉ. जितेंद्र विठ्ठल घाणेकर यांची चिपळूण पोलीस स्थानकातून खेडला बदली. पोलिस हवालदार राजेंद्र कमलाकर भाटकर यांची रत्नागिरी मुख्यालयातून रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात बदली. हवालदार भूषण जयसिंग सावंत यांची खेडहून दापोली येथे, संदीप मनोहर साळवी जयगडहून रत्नागिरी ग्रामीण, विजय भिकू येलकर खेडहून चिपळूण, पृथ्वीराज दशरथ देसाई पुर्णगडहून बाणकोट, मुकुंद मोरु महाडीक नियंत्रण कक्षातून रत्नागिरी ग्रामीण, जितेंद्र भालचंद्र साळवी मुख्यालयातून लांजा, सुजाता संदीप मोहिते चिपळुणहून सावर्डे, विजय ज्ञानेश्वर तोडणकर मुख्यालयातून संगमेश्वर, मोहन रामचंद्र कांबळे दापोलीहून रत्नागिरी ग्रामीण, घनशाम रामचंद्र जाधव पुर्णगडहून रत्नागिरी ग्रामीण, भालचंद्र श्रीराम रेवणे पुर्णगडहून लांजा, विजयकुमार गुंडाप्पा चावरे रत्नागिरी ग्रामीण येथून लांजा, उत्तम चंद्रकांत पिलणकर जिल्हा विशेष शाखेतून नाटे, दत्ताराम शांताराम बाणे देवरुखहून मंडणगड, संदीप शांताराम कोळंबेकर स्थानिक गुन्हे शाखेतून जिल्हा विशेष शाखा, सौरभी संतोष कांबळे मुख्यालय ते रत्नागिरी शहर, नीता गोपाळ बेंडये रत्नागिरी ग्रामीणहून पोलीस मुख्यालय, दीपक भिकाजी करंजवकर सावर्डेहून राजापूर, समीर पद्माकर सावंत जिल्हा विशेष शाखेतून पोलिस मुख्यालय, संजय शिवराम भारती पोलिस मुख्यालयातून जिल्हा विशेष शाखा, सुरेद्र शंकर शिंदे वाहतूक शाखेतून संगमेश्वर, स्वप्नील विजय साळवी अलोरेहून खेड, नरेंद्र सिताराम चव्हाण खेडहून अलोरे, संदीप अनंत नाईक चिपळूणहून पुर्णगड, विद्या विनायक साळवी संगमेश्वरहून पुर्णगड, अशोक महादेव पवार चिपळूणहून अलोरे पोलीस स्थानक अशा २८ पोलीस हवालदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर सहाय्यक पोलीस फौजदार (एएसआय) यांच्या बदल्यादेखील झाल्या आहेत. त्यामध्ये १८ सहाय्यक फौजदारांचा समावेश आहे. पद्माकर गुंड्ये रत्नागिरी ग्रामीण ते रत्नागिरी शहर, दिलीप शांताराम पवार लांजा ते मंडणगड, दीपक साळवी जयगड ते रत्नागिरी ग्रामीण, संजय साळवी रत्नागिरी शहर ते जयगड, रविंद्र बुरटे खेड ते दापोली, अनंत भिकाजी जाधव रत्नागिरी ग्रामीण ते जयगड, मिलिंद राजाराम चव्हाण गुहागर ते दापोली, नारायण यशवंत आडे बाणकोट ते मंडणगड, शालन प्रकाश शिंगाडे रत्नागिरी ग्रामीण ते रत्नागिरी शहर, संदीप मोहन महाडिक बाणकोट ते दापोली, जयवंत गणपत सोनावळे खेड ते दापोली, महेश पशुराम टेमकर दाभोळ ते रत्नागिरी ग्रामीण, विजया सुहास तांबडे देवरूख ते संगमेश्वर, संतोष विठ्ठल सुर्वे सावर्डे ते चिपळूण, वासुदेव बाबू चव्हाण पोलीस मुख्यालय ते रत्नागिरी शहर, लक्ष्मण धर्मा इंधन मुख्यालय ते रत्नागिरी शहर, सतीश भिकाजी आडिवरेकर पोलीस मुख्यालय ते वाहतूक शाखा रत्नागिरी, रेष्मा शरद भागवत पोलीस मुख्यालय ते रत्नागिरी शहर अशा १८ जणांच्या बदल्या झाल्या असून अन्य पाच जणांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात