(चिपळूण /ओंकार रेळेकर)
रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक १० जून रोजी सकाळी ११ वाजता ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता चिपळूण तालुका काँग्रेस संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी दिली आहे.
या बैठकीला जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष, महिला आघाडी तालुकाध्यक्ष, युवक अध्यक्ष, सेवादल अध्यक्ष, विद्यार्थी संघटना अध्यक्ष, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता चिपळूण काँग्रेस तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. सदर संपर्क कार्यालय सुसज्ज व्हावे, यासाठी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव प्रयत्न करीत आहेत. या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष यादव यांनी केले आहे.