(रत्नागिरी)
जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्ताने सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे “बंदिस्त खेकडा पालन संच : हाताळणी आणि व्यवस्थापन” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. २३ ते २५ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रम आयोजन करण्याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोलीचे सन्मानिय कुलगुरु डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत आणि शिक्षण संचालक डॉ. आंनद नरंगळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम दि. २३ नोव्हेंबर, २०२२ रोजी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. प्रकाश शिनगारे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी डॉ. शिनगारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये खेकडे संवर्धन अत्याधुनिक संच पद्धतीमध्ये खेकडे पालन हे कमी जागेत व कमी पाण्यात केली जात असल्यामुळे हा व्यवसाय सुरु करण्यास चांगली संधी आहे. तसेच बीज उपलब्धतेबाबतीत दर्शविलेल्या अडचणीबाबत रत्नागिरी जिल्हात लवकरच कोळंबी व खेकडा बीजोत्पादन केंद्र सुरु होणार अशी माहिती सांगितली.
या कार्यक्रमाची प्रस्तावना सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्राध्यापक डॉ. आसिफ पागरकर यांनी केली. यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी, आणि डॉ. संतोष मेतर, अभिरक्षक हे उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नरेन्द्र चोगले, सहाय्यक संशोधन अधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. कल्पेश शिंदे, सहाय्यक संशोधन अधिकारी यांनी काम केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून विशेषतः मुंबई, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे, वसई व रत्नागिरी येथील प्रशिक्षणांर्थीनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत तीन दिवसात खेकडा पालन संच हाताळणी व व्यवस्थापन या प्रशिक्षण कार्यक्रमात खेकडा पालनः सद्यस्थिती व वाव, खेकड्यांच्या जातींची ओळख व जीवनचक्र, जिवंत खेकडा पालन संच व हाताळणी, पाण्याचे गुणधर्म आणि व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, अर्थशास्त्र व प्रकल्प अहवाल कसा तयार करावा, खेकडा काढणी व काढणी पश्चात काळजी तसेच विक्री व्यवस्थापन या विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमा करीता प्रत्यक्ष या व्यवसायामध्ये काम करीत असलेले सातपाटी येथील श्री. आनंद तरे व उरण येथील श्री. जगदीश पाटील यांनी ऑनलाईन गुगल मिटद्वारे अनुभव कथन करून खेकडा संच प्रत्यक्ष कसे हाताळणी करावी याचे प्रात्यक्षीकासह मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा समारोप समारंभ दि. २३ नोव्हेंबर, २०२२ रोजी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मत्स्यकी शिक्षा संस्थेतील मत्स्यकी संसाधन एवं प्रग्रहणोपरांत प्रबंधन चे विभाग प्रमुख डॉ. बी. बी. नायक हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये खेकडा संवर्धनामध्ये खूप चांगला वाव असून अशाप्रकारचे प्रशिक्षण कर्यक्रम घेणे आवश्यक आहेत. या कार्यक्रमाला आध्यक्ष म्हणुन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. प्रकाश शिनगारे उपस्थित होते. यावेळी डॉ. शिनगारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्रशिक्षणांर्थीनी आम्ही दिलेल्या प्रमाणपत्राच्या उपयोग शासकीय योजनांकरीता करावा परंतु दिलेल्या ज्ञानाच्या उपयोग करून यशस्वी उद्योजक होण्याकरिता शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाची प्रस्तावना सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्राध्यापक डॉ. आसिफ पागरकर यांनी केली. यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रा. नरेन्द्र चोगले, सहाय्यक संशोधन अधिकारी, हे उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष मेतर, अभिरक्षक यांनी केले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणुन प्रा. कल्पेश शिंदे, सहाय्यक संशोधन अधिकारी यांनी काम केले.
प्रशिक्षणांर्थी श्री. माळी यांनी आपल्या मनोगतामध्ये हा प्रशिक्षणामध्ये आम्हाला प्रत्यक्ष मिळालेले ज्ञान असून आम्हाला प्रत्यक्ष खेकडा पालनाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. श्री. पाथरे यांनी बंदिस्त खेकडा पालन संचाच्या पुरेपूर वापर करून स्वत: हा उद्योग करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यास श्री. रमेश सावर्डेकर, श्री. मंगेश नांदगावकर, श्री. महेश किल्लेकर, श्री. दिनेश कुबल, श्री. सिद्धेश कांबळे, श्री. मनिष शिंदे, श्री. मुकुंद देवूरकर, श्री. अण्णासाहेब कारखेले, श्री. सुहास कांबळे, श्री. सचिन चव्हाण, श्री. विवेक धुमाळ, श्री. प्रविण गायकवाड तसेच कंत्राटी मजूर श्री. स्वप्नील अलीम, श्री. तेजस जोशी, श्री. अभिजित मयेकर, श्री. उल्हास पेडणेकर, श्री. महेश बाणे, श्री. गुरुदत्त किल्लेकर आणि श्री दर्शन शिंदे यांनी मेहनत घेतली.