( रत्नागिरी / प्रतिनिधी )
कोतवडे ते जांभरुण असा दुचाकीवरुन प्रवास करताना अपघात झाला. या अपघातात महिला जखमी झाल्याची घटना घडली. अपघात प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र अशोक देवरुखकर (जांभरुण पोस्ट वेतोशी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र देवरुखकर हा आपल्या आईला दुचाकीवरुन घेवून कोतवडे ते जांभरुण असा जात होता. यावेळी वेतोशी धरण येथील चढावात भरधाव वेगाने गाडी चालवल्याने पाठीमागे बसलेल्या गितांजली अशोक देवरुखकर (58, जांभरुण पोस्ट वेतोशी) या दुचाकीवरुन पडून अपघात झाला. या अपघात गितांजली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुलगा जितेंद्र देवरुखकर याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार विनायक राजवैद्य यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली.