(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राज्यातील अनेक खेळाडूंचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला अखेर 16 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. कोकणातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे ओम साई स्पोर्टस् आयोजित व पालकमंत्री उदय सामंत पुरस्कृत नाईट ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे सोमवार दिनांक १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२३ रोजी दरम्यान होणार आहे.
विजेता संघाला मिळणार आहेत ५ लाख ५५ हजर ५५५ रोख रक्कम व आकर्षक चषक, उपविजेता संघाला ३ लाख ३३ हजार ३३३ रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेतील मालिकावीराला ठाणे येथील उद्योजक नरेश शेठ भोईर यांच्याकडून दुचाकी पारितोषिक म्हणून देण्यात येईल. तसेच स्पर्धेतील उगवता तारा यांना प्रतिक जयू सावंत याजकडून २२,२२२ रोख रक्कम व चषक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी ११,१११ रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यातील सामनावीर यांना प्रत्येकी आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.