रत्नागिरी : जिल्ह्याला एक आगळीवेगळी ओळख मिळवून देणारी लक्षवेधक स्पर्धा म्हणजेच ओम-साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी-2022 चा मानकरी ठरला आहे तो रोहन- 11 संघ. तर उपविजेता पदाचा मान मिळाला आहे तो शारीक भोपाळ संघाला.
रविवारी रात्री झालेल्या या फायनल सामन्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी पहायला मिळाली. दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे कडवी झुंज होणार अशी प्रेक्षकांची आशा होती. मात्र शारीक भोपाळ संघांनी प्रेक्षकांची पुरती निराशा केली. पहिल्या षटकात शारीक भोपाळ संघाला 2 या धाव संख्येवर 3 गडी गमवावे लागले. मात्र याचवेळी आलेल्या पवारकडून मोठी धाव संख्या उभी राहील अशी आशा असतानाच त्यालाही रोशन इलेव्हन संघाने माघारी धाडले. लागोपाठच्या धक्क्याने शारीक भोपाळ संघ सावरू शकला नाही. 6 षटकात केवळ 28 च धावा बनवल्याने प्रेक्षक गॅलरीत सन्नाटा पसरला होता. प्रेक्षकांनी परतीची वाट धरली होती.
दरम्यान 29 धावांच्या माफक आव्हानाचा सामना करताना रोहन इलेव्हनच्या प्रथम फलंदाजीला आलेल्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर 6 खेचत संघाचे इरादे स्पष्ट केले. तरीही संघाला 2 धक्के बसले. मात्र 2.2 षटकातच 29 धावा फलकावर टेकवत शानदार विजय संपादन केला. रोहन 11 संघाच्या गोठात जल्लोषाचे वातावरण होते.
*या स्पर्धेतील पदाचे मानकरी*
▪️ मॅन ऑफ द मॅच – *वरून कुमार*
▪️ बेस्ट बॅट्समन – *दिनू कांबळे*
▪️ बेस्ट बॉलर – *वरून कुमार*
▪️ इमर्जिंग प्लेअर – *अंगत पाटील*
▪️ मॅन ऑफ द सिरीज – *किरण पवार*
या स्पर्धेत अँपायर्स म्हणून काम पाहिलं- अक्षय कोळंबेकर, विश्वनाथ लिंगायत, गौरव भागवत,मेघेश मोंडकर, श्रीकांत कुडव यांनी. तर स्कोरर म्हणून सोनम चव्हाण, दर्शना पवार यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
या स्पर्धेचे टेक्निकल कमिटी दीपक मोरे, सईद मुकादम, अमित लांजेकर,बाळाराम कोतवडेकर , विजय कांबळे, अतिक पाटणकर, बाळू साळवी यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. तर या संपूर्ण स्पर्धेचे अँकरिंग केलंय ते अभिजित गोडबोले यांनी.
*🚨रत्नागिरी 24 तास*
*अपडेट रहा, स्मार्ट बना…!*
*www.ratnagiri24taas.com*
*l ज्ञान l मनोरंजन l आरोग्य l टिप्स-ट्रीक्स l*
https://bit.ly/31FWW5X
Reg. No. MH-28-0009536
*——————————–*
⏩ *व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक*
https://bit.ly/3oVlyjH
➡️ *बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क :*
📞9527509806