(रत्नागिरी)
शहरातील गवळीवाडा येथे डोक्यात दगड घालून तरूणाचा खून केल्याचा आरोप असलेल्या संशयिताची न्यायालयाने 50 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केल़ी. वेदांग चंद्रकांत आखाडे (18, ऱा गवळीवाडा रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आह़े. त्याच्यावर विल्सन सॅम्युअल वाघचौरे (35, ऱा बोर्डींग रोड, रत्नागिरी) याचा खून केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा. त्याला शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली होत़ी.
खून प्रकरणात अटक झाल्यानंतर वेदांग याच्याकडून जामिनासाठी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल करण्यात आला होत़ा. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल अंबालकर यांनी जामीन अर्जावर निर्णय दिल़ा. गुन्ह्यातील माहितीनुसार, वेदांग आखाडे व विल्सन वाघचौरे यांची 19 एप्रिल 2023 रोजी पहाटे 4 च्या सुमारास साई चौक गवळीवाडा येथे भेट झाली होत़ी. यावेळी दोघांमध्ये काही काळ बाचाबाची झाल़ी. यावेळी विल्सनने शिवी दिली. या रागातून वेदांग याने विल्सन याच्या डोक्यात दगड घातल़ा. तसेच विल्सन याला जखमी अवस्थेत टाकून वेदांगने घटनास्थळावरून पळ काढला, असा आरोप वेदांगवर ठेवण्यात आल़ा. जखमी अवस्थेत आढळलेल्या विल्सन याला पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल केले होत़े. उपचारादरम्यान विल्सन याचा मृत्यू झाला होत़ा. या प्रकरणी विल्सन याची बहीण प्लेवी वाघचौरे हिने शहर पोलिसात तक्रार दाखल केली होत़ी. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरूद्ध भादंवि कलम 302 नुसार खूनाचा गुन्हा दाखल केल़ा तसेच पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आल़ी. दरम्यान आपल्याला जामीन मिळावा, यासाठी वेदांगकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होत़ा.
जामीन अर्जावरील सुनावणीवेळी वेदांग याच्यावतीने न्यायालयापुढे सांगण्यात आले की, वेदांग याने खून केल्याचा कोणताही ठोस पुरावा पोलिसांकडे आढळला नाह़ी. तसेच खूनाचा हेतू स्पष्ट होत नाह़ी. मृत याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे त्याचा सातत्याने कुणाशी ना कुणाशी वाद होत होत़ा. पोलिसांचा बहुतेक तपास पूर्ण झाल्याचे दिसत आह़े. वेदांग हा केवळ 18 वर्षाचा असून तो निर्दोष आह़े. पोलीस तपासात तो सहकार्य करेल, असे न्यायालयापुढे सांगण्यात आल़े.
सरकार पक्षाकडून जामिनाला विरोध करताना सांगण्यात आले की, वेदांग याने केलेला अपराध हा गंभीर स्वरूपाचा आह़े. अत्यंत निर्दयीपणे त्याने खून केला आह़े. त्याची जामिनावर मुक्तता केल्यास तो तक्रारदार व साक्षीदारांना धमकावू शकत़ो. त्यामुळे जामीन देवू नये, असे न्यायालयापुढे सांगण्यात आल़े. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने वेदांगची 50 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केल़ी.