(रत्नागिरी)
शहरातील खालचा फगरवठार येथे चोरटयांनी घर फोडून सव्वा तीन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना २० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान घडली. पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. विजय राजाराम वाळवे (३४, खालचा फगरवठार, रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद प्रज्ञा परशुराम पाष्टे (४७, घरकाम्, खालचा फगरवठार, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्ञा पाष्टे या २० ते २४ फेब्रुवारी दरम्यान घरी नसताना विजय वाळवे याने घरातील कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. यामध्ये २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे व काळे मणी असलेले मंगळसूत्र, ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे लहान मणी असलेले मंगळसूत्र, २५ हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, १० हजार रुपयांचे सोन्याचे कर्णफुल, १५ हजारांचे कर्णफुल, ८ उजार रुपयांचे सोन्याचे कर्णफुल पट्टी, १० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख १४ हजार तपयांचा ऐवज लंपास केला.
याप्रकरणी प्रज्ञा पाष्टे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी विजय वाळवे यांच्या भावविकलम १४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला.