( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे येथे आज साईट पट्टीवरून घसरून टँकर दरीत कोसळल्याची घटना घडली. टँकर दरीत कोसळणार कळताच चालकाने गाडीतून उडी मारल्याने सुदैवाने बचावला. हा अपघात दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडला.
कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने उसाची मळी घेऊन चालक जात होता. रस्त्याच्या एकदम कडेवरून गाडी घेऊन जाताना ओल्या आणि निसरड्या जमिनीमुळे ट्रकच्या वजनाने रस्त्याच्या बाजूची जमीन खचली. यामध्ये टँकरच्या मागचं चाक हळू हळू खाली जाऊन लागल्याने चालकाने उडी मारली. यामुळे तो बचावला त्यानंतर टँकर झाडाला जाऊन आदळला. जवळपास टँकर 50 फूट खोल दरीत कोसळला.
अपघाताची माहिती मिळताच दाभोळे पोलिस दुरक्षेत्राचे मृत्युंजय दूध ग्रुपचे प्रतिनिधी दीपक कांबळे, महामार्ग पोलीस मदत केंद्र हातखंबाचे कर्मचारी, एपीआय विक्रम सिंह पाटील उत्तेकर, मुरकर तसेच साखरपा पोलीस दुरक्षेत्राचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकर चालकाची चौकशी केली. टँकर चालकाने अपघाताची माहिती दिली.