(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी येथील डॉ. राधाराणी पाटील यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. त्या आम आदमी पार्टी रत्नागिरी संयोजक ज्योतिप्रभा पाटील यांच्या आई असून याबाबत ज्योतिप्रभा यांनी पोलीस अधीक्षक आणि गृह विभागाच्या सहाय्यक मुख्य सचिवांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नेत्रतज्ञ डॉ. राधाराणी पाटील आणि आम आदमी पार्टी रत्नागिरी जिल्हा संयोजकांच्या आई असून त्यांना 2 मार्च रोजी रात्री 8 वाजता रत्नागिरी पोलीस ठाण्यात हवालदार असल्याचा दावा करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोनवरील व्यक्तीने डॉ. राधाराणी पाटील यांच्याशी उंच स्वरात बोलून त्यांना सांगितले की, पोलीस विभाग रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व धर्मादाय संस्थांची माहिती गोळा करत आहे आणि तपास करत आहे. या बाबतची माहिती मिळताच श्री ज्योतिप्रभा पाटील यांनी त्या व्यक्तीशी फोनवर बोलून चौकशी करण्यास कोणी परवानगी दिली व ते कोणत्या कायद्यात किंवा परिपत्रकानुसार हा तपास करत आहेत, याची चौकशी केली असता ती व्यक्ती श्री. ज्योतिप्रभा यांना उत्तर देऊ शकली नाही आणि त्याने संशयास्पदरीत्या कॉल डिस्कनेक्ट केला.
त्यानंतर श्री ज्योतिप्रभा यांनी पोलिस स्टेशनशी संपर्क साधला आणि अधिकाऱ्यांशी बोलून, त्यांच्याकडून असा तपास मान्य करण्यात आला आहे की नाही याबाबत विचारणा केली, ,मात्र त्यावर श्री ज्योतिप्रभा यांना उत्तर मिळाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.