(गणपतीपुळे / वैभव पवार)
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी आणि संस्कार समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक 3 जुलै ते 28 ऑक्टोबर या कालावधीत बौद्ध धम्मात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या वर्षावास या धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षावास कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवार दिनांक 3 जुलै रोजी आषाढी पौर्णिमेच्या दिनी रत्नागिरी शिवाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. यावेळी बौद्धजन पंचायत समिती मुंबई मुख्य समितीचे प्रतिनिधी श्रीधर साळवी व प्रमोद सावंत हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच या शुभारंभाच्या कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेचे उपक्रमशील धडाडीचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, उपचिटणीस नरेंद्र आयरे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, संस्कार समितीचे सभापती संजय आयरे, संस्कार समितीचे चिटणीस रविकांत पवार आदींसह तालुका शाखेच्या विविध उपसमित्यांचे प्रमुख पदाधिकारी व गावशाखांचे प्रतिनिधी, श्रामणेर, बौध्दाचार्य आणि तालुक्यातील धम्मबंधूभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या वर्षावास कार्यक्रमाचे नियोजन बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा व संस्कार समिती रत्नागिरी यांचे वतीने करण्यात आले असून विविध गावशाखांमध्ये प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये रविवार दिनांक 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पुनस गावशाखेमध्ये वर्षावास कार्यक्रम होणार आहे. यावेळी बौध्दााचार्य रविकांत पवार मार्गदर्शक म्हणून असणार आहेत
तर निवेंडी भगवतीनगर येथे 13 ऑगस्ट रोजी वर्षावास कार्यक्रम घेण्यात येणार आहेे. यावेळी बौद्धाचार्य संदीप जाधव हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच करबुडे कपिलवस्तुनगर येथे 27 ऑगस्ट रोजी वर्षावास कार्यक्रम होणार असून बौध्दाचार्य संजय आयरे हे मार्गदर्शन करणार आहेत तर अशोकनगर परटवणे येथे 3 सप्टेंबर रोजी वर्षावास कार्यक्रम होणार असून बौध्दाचार्य वैभव पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर कासारी येथे 17 सप्टेंबर रोजी वर्षावास कार्यक्रम होणार असून बौध्दाचार्य सुुुहास कांंबळे हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच 15 आक्टोबर रोजी चाांदोर येथे वर्षावास कार्यक्रम होणार असून बौद्धाचार्य सुवेश चव्हाण हे मार्गदर्शन करणार आहेत. तर वरवडे येथे 22 ऑक्टोबर रोजी वर्षावास कार्यक्रम होणार असून बौध्दउपासक वसंत साळवी हे मार्गदर्शन करणार आहेत. तर 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता गडनरळ गाव शाखेमध्ये वर्षावास कार्यक्रमाचा समारोप पूज्य भन्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्म प्रवचनाने होणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमांना गावशाखा पदाधिकारी,उपासक, उपासिका, बौद्धाचार्य यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आव्हान तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार ,चिटणीस सुहास कांबळे, संस्कार समितीचे अध्यक्ष संजय आयरे व चिटणीस रविकांत पवार यांनी केले आहे.