रत्नागिरी जिल्हयाची गरज आणि भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन अधिक रुग्णवाहिका मिळवून देण्याचा प्रयत्न आपण करु अशी ग्वाही रत्नागिरीचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी 26 रुग्णवाहिकांच्या लोकार्पण प्रसंगी दिली.
दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी या ॲम्बुलन्सचे लोकार्पण केले. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार राजन साळवी, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष उदय बने, बांधकाम व आरोग्य सभापती बाबू म्हाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड आदी जिल्हा परिषद रत्नागिरी येथून उपस्थित होते. तसेच ऑनलाईन पध्दतीने खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची उपस्थिती होती.
रत्नागिरी जिल्हयाला एकदाच मोठया प्रमाणात 26 रुग्णवाहिका मंजूर झालेल्या आहेत. 9 रुग्णवाहिका खनिकर्म निधी मधुन मंजूर करण्यात आल्या तसेच 7 रुग्णवाहिका या शासनाकडून मिळाल्या आहेत व 10 रुग्णवाहिका ग्राम विकास विभाग मार्फत या चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रक्कमेतून मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यात जिल्हा रुग्णालयाच्या 2 कार्डीयाक रुग्णवाहिकांचाही समावेश आहे.
अशा प्रकारे एकूण 26 रुग्णवाहिका रत्नागिरी जिल्हयाला मिळणार आहेत. यामुळे रुग्णांना गुणवत्ता पूर्ण संदर्भ सेवा देण्यात येतील व जिल्हयाचे आरोग्य दर्जा सुधारेल, अशी खात्री पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी व्यक्त केली.