(रत्नागिरी)
वे. मू. वैदिक मार्तंड व वैदिक शिरोमणी (कै.) विनायक आठल्ये गुरुजी व व्याकरणाचार्य (कै.) पु. ना. फडकेशास्त्री यांच्या स्मृती प्रीत्यर्थ २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत झाडगाव येथील संस्कृत पाठशाळेमध्ये धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
दि. २३ ते २७ फेब्रुवारीला दररोज सकाळी ७.३० ते १२.३० या वेळेत ऋग्वेद संहिता पारायण श्री. वे. मू. दत्तात्रेय मुरवणे गुरूजी करतील. दि. २३ व २४ ला सायंकाळी ५.०० ते ७.३० या वेळेत ह. भ. प. निशिकांत टेंगशे (गोवा) कीर्तनसेवा करणार आहेत. दि. २५ ते २७ फेब्रुवारीला दररोज वेदशाळेमध्ये सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत ब्रह्मवर्चसकाम श्रौतयज्ञाचे (ब्रह्मणस्पति इष्टि, पवित्रेष्टि, मित्रविंदेष्टि) आयोजन केले आहे. वे. मू. गणेश जोगळेकर गुरूजी (गोकर्ण, महाबळेश्वर) हे पौरोहित्य करतील. दि. २५ ते २७ फेब्रुवारीला दररोज सायंकाळी ४ ते ६ व ६.३० ते ८ या वेळेत वे. मू. सचिन भाटवडेकर गुरूजी (कडावल) हे रामकथा (बालकांड, भरत चरित्र, हनुमान चरित्र) या विषयावर निरुपण करतील. दि. २७ फेब्रुवारीला सायंकाळी ७.०० वाजता संस्कृत पाठशाळेत वे. मू. घनपाठी दिनकरगुरु माधव फडके (पुणे) यांचा सत्कार समारंभ आयोजित केला.
या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सर्व माजी विद्यार्थी व वे.मू.वैदिक मार्तंड व वैदिकशिरोमणी (कै.) विनायक सी. आठल्ये गुरुजी व व्याकरणाचार्य (कै.) पु. ना. फडकेशास्त्री स्मृती समितीने केले आहे. माजी विद्यार्थ्यांनी संपर्क करून सर्वतोपरी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यक्रम समितीने केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष कुवळेकर (९४२२४३०३१५ / ७०२०१३१७७४) किंवा सचिन आठल्ये (९९७०८४१४७७) यांच्याशी संपर्क साधावा.