(रत्नागिरी)
मंथन द स्कूल आँफ क्रिएटिव्ह अँडव्हर्टायझिंग अँड आर्ट, रत्नागिरीच्या मंचावर व्यंगचित्रकलेचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले होते. हे मार्गदर्शन लोकसत्ता दैनिकाचे जेष्ट व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी केले. मुंबईहून खास ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. हे मराठीतील एक उत्कृष्ट व्यगंचित्रकार आहेत. गेल्या पस्तीस वर्षात त्यांची विविध नियतकालिकांतून अंदाजे वीस हजार व्यंगचित्र प्रकाशित झाली आहेत.
प्रशांत कुलकर्णी यांचा ‘रेषा, भाषा आणि हशा’ हा व्यंगचित्रांचा कार्यक्रम मराठी रसिकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. ‘कार्टून धमाल’ हा कार्यक्रम विद्यार्थीप्रिय आहे. या कार्यक्रमातून ते विद्यार्थ्यांना व्यंगचित्र कशी काढावित, चेहरे कसे रेखाटावेत या विषयी सदर कार्यक्रमात मार्गदर्शन केले. बेसिक रेषेपासून ते डिझनी वल्ड अँनिमेशन पर्यंत कार्टून प्रकार याची माहिती दिली. साध्या आकारापासून ते क्रिएटीव्ह चित्रापर्यंत या शिबीरात माहिती दिली गेली.
प्रशांत कुलकर्णी यांसारख्या प्रतिभावंत कलाकाराचे मुलांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन मिळाले. मुलांना आनंदासह, नाविण्यतेची पुन्हा ओळख कार्टूनच्या माध्यमातून झाली, याचे समाधान सहभागी मुलांसह आयोजकांनाही मिळाले. या कार्यक्रमास प्रशांत कुलकर्णी याच्या पत्नी प्रा.वर्षा कुलकर्णी याही उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे मार्गदर्शक प्रा.नंदकुमार यादव, डेप्युटी इंजि.उदय शिंदे, निलीमा शिंदे, डाॅ.रंजना खोचरे, अँड.सुनिल भडेकर, प्रा.प्रतिक्षा पांचाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यासर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तथा नियोजन प्रा.संदेश पालये यांनी केले. सदर कार्यक्रमाला शुभेच्छा मंथनचे डायरेक्टर प्रा.शशिकांत गवळी यांनी व्यक्त केल्या.