(रत्नागिरी)
रत्नागिरीत आलेल्या मुंबईतील प्रौढाचा लॉजमध्ये आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली. हा प्रकार बुधवारी (३१ मे) रोजी सायंकाळी ५:३० वाजता घडला. राजें वसंत बाणे (वय ५४, रा. सीजी एस कॉलनी सेक्टर नं. ७, मुंबई) असे प्रौढाचे नाव आहे.
राजेंद्र बाणे हे गुरुवारी (२५ मे मुंबईहून रत्नागिरी येथे आले होते. शहरातील कंदिल लॉजमध्ये वास्तव्याला होते. बुधवारी सायंकाळी त्यांच्या खोलीतून कणण्यासारख आवाज येत होता. लॉजच्या कर्मचाऱ्याने आतमध्ये जाऊन पाहिल असता त्याला राजेंद्र बाणे झोपलेले दिसले. त्यांचे अंग गरम होते. परंतु काही हालचाल करत नसल्याने कर्मचाऱ्याने याबाबत लॉज मालकाल माहिती दिली. त्यांनी तातडीन रुग्णवाहिका बोलावून राजेंद्र बाप यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाणे यांना तपासून मृत घोषित केले.