( रत्नागिरी )
बनावट कागदपत्रांद्वारे शेत पिकासाठी बँकेकडून 5 कोटीचे कर्ज घेऊन फसवणूक करणाऱ्या मुख्य सुत्रधाराला रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन नाकारला आहे. मात्र 20 जणांपैकी 9 जणांचा जामीन कोर्टाने मंजूर केला आहे.
25 मे 2015 ते 14 जुलै 2016 या कालावधीत रत्नागिरीतील युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेकडून आंबा पिकाच्या कर्जासाठी 20 जणांनी संगनमताने बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेतले होते. यामध्ये सुमारे 5 कोटी 13 लाख रुपयांची बँकेची फसवणूक झाली होती.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार शहरातील युनियन बँकेला घालण्यात आलेल्या 5 कोटींच्या फसवूणक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या राजेश शंकर सनगरे (भाटीमिऱ्या रत्नागिरी) या मुख्य संशयिताचा अटकपूर्व जामीन न्यायालयाकडून फेटाळण्यात आल़ा. यातील अन्य 9 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आह़े. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधिश बिले यांच्या कोर्टात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाल़ी. सरकारी पक्षाकडून ऍड़ अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिल़े. यापूर्वी न्यायालयाने दिवाकर रघूनाथ पाटील (ताणदे हनुमानवाडी रत्नागिरी ) व प्रीती विजय कदम (शीळ रत्नागिरी) यांच्यासह अन्य 9 जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केले होते.
माहितीनुसार 2015-16 मध्ये रत्नागिरीमधील 20 जणांनी जयस्तंभ येथील युनियन बँकेच्या शाखेत शेती पीकपाणी कर्जासाठी सातबारा उतारा, भाडे करारपत्र, मुखत्यारपत्र आदी बनावट कागदपत्रे सादर केल़ी होती. बँकेकडून या कागदपत्रांची शहानिशा न करताच 5 कोटी 12 लाख 98 हजार रूपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आल़े.
यातील राजेश सनगरे हा कर्ज वाटपामध्ये एजंटची भूमिका निभावत होत़ा. यावेळी बनावट कागदपत्रे तयार केली तसेच शेतकऱ्यांकडून चेक देखील मिळविले होत़े. या चेकच्या माध्यमातून राजेशने शेतकऱ्यांच्या खात्यातील 1 कोटी 38 लाख 53 हजार रूपये काढले, तसेच बनावट स्टॅम्प पेपर देखील तयार केले असा आरोप राजेश याच्यावर ठेवण्यात आला आह़े. राजेश याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडून त्याला अटक होण्याची शक्यता आहे.
अनेक वर्ष उलटूनही या कर्जाची परतफेड करण्यात आलेली नाह़ी यासंबंधी बँकेकडून झालेल्या ऑडीटमध्ये खोटी कागदपत्रे सादर केल्याचे समोर आल़े. यासंबंधी शहर पोलिसांत बँक मॅनेजरसह 23 जणांविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आल़ी. विरेश चंद्रशेखर (36, जोशी पाळंद रत्नागिरी) यांनी याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी
*🚨रत्नागिरी 24 तास*
*अपडेट रहा, स्मार्ट बना…!*
*www.ratnagiri24taas.com*
*l ज्ञान l मनोरंजन l आरोग्य l टिप्स-ट्रीक्स l*
Reg. No. MH-28-0009536
➡️ बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क : 9527509806