(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील शिवाजी स्टेडियम समोर असलेल्या मारुतीमंदिर येथील देवळात आज (शनिवार) पहाटे चोरी झाल्याची घटना घडली असून चोरट्यांनी दानपेटी फोडून रोकड लांबविली आहे. दानपेटीतील मोठया नोटांची चोरी झाली असून छोट्या नोटा दानपेटीत तशाच ठेवल्या आहेत. आजूबाजूला असलेल्या सी सी टीव्ही फुटेज मध्ये चोर नाचणे रोडच्या दिशेने पळाल्याचे दिसत आहे
या चोरीचा तपास रत्नागिरी शहर पोलिसांनी तत्काळ सुरु केला आहे. पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली असावी, अशी शक्यता पोलिसांनी दर्शविली असून मंदिर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याने चोराचा लवकरच शोध लागेल, असे तपासिक पोलीस अंमलदारांनी सांगितले.