(रत्नागिरी)
रत्नागिरी विमानतळ परिसरात बांधकाम करत असताना पडून जखमी झाल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 8 च्या सुमारास घडल़ी. मंगेश लक्ष्मण ठीक (45, ऱा करबुडे रत्नागिरी) असे मृताचे नाव आह़े. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगेश ठिक हा रत्नागिरी विमानतळ परिसरात बांधकामाचे काम करत होत़ा. 11 जून 2023 रोजी सकाळी 8 च्या सुमारास मंगेश हा सिमेंटची पोती नेत असताना अचानक त्याला चक्कर आल़ी. यावेळी मंगेश 7 फुटावरून खाली पडून बेशुद्ध झाल़ा. त्याला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल़े. रूग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी 2.30 च्या सुमारास मंगेश याचा मृत्यू झाल़ा.