रत्नागिरी शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून शहरातील कोरोना आरटीपीसीआर चाचण्या वाढविणे आवश्यक आहे.या अनुषंगाने रत्नागिरी नगर परिषद व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फिरते कोरोना चाचणी पथक आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत रत्नागिरी शहरातील प्रत्येक प्रभागातील एका विशिष्ट ठिकाणी व विशिष्ट दिवशी फिरत्या पथकाद्वारे कोरोना आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार आहे.जेणेकरून कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर निदान होऊन योग्य उपचारांमुळे संभाव्य जिवित हानी टळू शकेल.
तरी संशयित किंवा सौम्य ,अतिसौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांनी आपल्या नजिकच्या फिरते कोरोना चाचणी पथकाद्वारे तपासणी करुन या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.नागरिकांनी तपासणी पथकाच्या ठिकाणी कोरोनाविषयक नियमावलीचे पालन करून सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यत तपासणी करुन घ्यावी.
आठवड्याच्या सात दिवस तपासणी होणारी ठिकाणे पुढीलप्रमाणे सोमवारी अ.के.देसाई हायस्कूल माळनाका रत्नागिरी, मंगळवारी धनंजय कीर सभागृह,न.प कर्मचारी वसाहत,बुधवारी जिल्हा क्रीडा संकुल मारुती मंदीर रत्नागिरी,गुरुवारी न.प शाळा क्र १ गाडीतळ रत्नागिरी, शुक्रवारी न.प शाळा क्र ८ भैरी मंदीर जवळ रत्नागिरी, शनिवारी भागेश्वर विद्यामंदीर, किल्ला शाळा क्र ९ ,रविवारी न.प शाळा क्र ३ चवंडे वठार याठिकाणी नागरिक तपासणी करु शकतात असे कळविण्यात आले आहे.