(रत्नागिरी)
रत्नागिरी शहर परिसरात चालणाऱ्या अवैध जुगारावर रत्नागिरी शहर पोलिसांकडून शनिवारी धडक कारवाई करण्यात आली. तीन ठिकाणी पोलिसांकडून टाकण्यात आलेल्या छाप्यात अवैध जुगाराचे साहित्य व रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी जुगार चालवणाऱ्या तिघाजणांवर शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलिसांकडून २५ मार्च रोजी शहरातील मिरकरवाडा जेटी, मारूती मंदिर व परटवणे येथे ही कारवाई करण्यात आली.
शहरातील मिरकरवाडा जेटी येथे ऋषीकेश दत्ताराम मूरकर (३२, रा. मुरूगवाडा रत्नागिरी), परटवणे नाका येथे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये योगेश कृष्णा फाळके (३३, रा. मिरजोळे पाडावेवाडी) व मारुती मंदिर चणाभट्टीशेजारील गल्लीत करण्यात आलेल्या. कारवाईमध्ये रवीकांत वासुदेव घोसाळकर (५६, रा. संसारेवाडी मारूती मंदिर, रत्नागिरी) यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला