(रत्नागिरी)
शहरातील गवळीवाडा येथे शिवी दिल्याच्या रागातून तरूणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना 19 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजता घडली. विल्सन सॅम्युअल वाघचौरे (35, ऱा बोर्डींग रोड रत्नागिरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वेदांग चद्रकांत आखाडे (18, ऱा गवळीवाडा रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेदांग आणि विल्सन वाघचौरे यांचे 19 एप्रिल 2023 रोजी पहाटे गवळीवाडा येथे बाचाबाची झाल़ी. विल्सन याने शिवीगाळ केली. या रागातून वेदांग याने विल्सन याच्या डोक्यात दगड घातल़ा. आणि तेथून पळ काढला. पहाटे पोलिसांना विल्सन हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होत़ा. त्याला जिल्हा शासकीय रूग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान याप्रकरणी विल्सनच्या पत्नीने शहर पोलिसात तक्रार दिली. उपचार सुरू असताना विल्सन याचा मृत्यू झाल्याने पोलिसांकडून खूनाचे कलम दाखल केले आह़े यापकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.
पोलिसांनी वेदांग त्याच्या विरोधात भादंवि कलम 302 नुसार खूनाचा गुन्हा दाखल केल़ा. दरम्यान आज सोमवारी वेदांग याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल़ी.