(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सुरत न्यायालयाने मानहानी प्रकरणात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसने शनिवारी रत्नागिरी शहरात ‘हाथ से हाथ जोडो, नफरत छोडो, भारत जोडो’ अभियान राबवले.
शहरातील तेली आळी, आठवडा बाजार येथे ‘हाथ से हाथ जोडो’ कार्यक्रम राबवताना व्यापारी व सामान्य नागरिकांना नफरत छोडो भारत जोडो साठी काँग्रेसला सपोर्ट करण्याची विनंती केली.
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष ॲड. अश्विनी आगाशे, हारिस शेकासन, रमेश शाहा, रवी खेडेकर, रिजवाना शेख, सीमा राणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ‘हाथ से जोडो, नफरत छोडो, भारत जोडो’ या कार्यक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. जिल्ह्याच्या विविध भागातून राहुल गांधी यांना पाठिंबा व्यक्त केला जात असून आता राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी आंदोलन तीव्र केले जाणार असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.