(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दोन महिन्यांपूर्वी शहरातील काँग्रेस भुवन येथील निलराज लॉजवर एमडी या अंमली पदार्थासह दोघांना पकडले होते . त्यातील मुख्य आरोपीला शहर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी केरळमधून अटक केली . बुधवारी त्याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली . मोहम्मद अब्दुल जासीम ( २७ , रा . केरळ ) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे .
१ मार्च रोजी पहाटे ४.४५ वा . शहर पोलीस व डिबी पथकाने निलराज लॉजवर छापा टाकून सुमारे ४ लाख ९ ५ हजार रुपयांचा ९९ ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ जप्त केला . त्यावेळी शियाद ए . के . ( २५ ) आणि नजब मोईद नौफर ( २५ , दोन्ही रा . केरळ ) या दोघांना अटक करण्यात आली होती . परंतु या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत होते . या प्रकरणी पोलिसांचे एक पथक केरळला रवाना करण्यात आले होते . या पथकाला मंगळवारी मुख्य आरोपी मोहम्मद जासीमला अटक करण्यात यश आले . बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची रवानगी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत केली .