(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्याचे रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शन माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी आणि सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने सावर्डे येथे संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनाला राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी- रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज भेट देत विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत मार्गदर्शन करताना म्हणाले, रत्नागिरीतुन एखादा आंतरराष्ट्रीय दर्जाचा शास्त्रज्ञ घडवा असे काम रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांनी करा.अनेक अब्दुल कलाम रत्नागिरीतुन निर्माण होतील असे रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना घडवण्याची भूमिका माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांनी घेण्याची गरज आहे. आधुनिकतेला तोड देणारा विद्यार्थी रत्नागिरी तयार झाला पाहिजे. या कार्यक्रमादरम्यान चिपळूण येथे शिक्षकांनी विज्ञान भवनाची मागणी केली.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, विज्ञान भवन ही काळाची गरज असून विज्ञान भवनाला लागतील तेवढा निधी देणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर करत ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील विज्ञान भवन बघायचं असेल तर रत्नागिरी यावे लागेल असे विज्ञान भवन तयार करण्याचा ध्यास आपण घेतला आहे. या विज्ञान प्रदर्शनाला पालकमंत्री उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखरजी निकम, माजी सभापती पूजा निकम, सरपंच समीक्षा बागवे, पिंट्या शेठ पाकळे, सुधीर शिंदे, रत्नागिरी तालुकाप्रमुख बाबुशेठ म्हाप, प्रांतअधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्ण सावंत, गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील, गटशिक्षणाधिकारी इरनाक दादासाहेब यांच्या सहित अनेक पदाधिकारी आणि शिक्षक अधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.