(रत्नागिरी)
रत्नागिरी एस. टी. बस स्थानकात 20 आधुनिक एस. टी बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
रा.प. महामंडळामध्ये नविन साध्या बीएस ६ बांधणी असलेल्या भाडेतत्वावरील बसेस [खाजगी] सध्या दाखल होत असून पहिल्या टप्प्यामध्ये एकूण ५० बसेस या रा. प. रत्नागिरी विभागामध्ये दाखल होणार आहेत. या बसद्वारे रा. प. रत्नागिरी, चिपळूण व खेड आगारामार्फत लांब व मध्यम लांबपल्ला मार्गावरील फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. त्यापैकी रा.प. रत्नागिरी आगाराकरीता २० बसेस प्राप्त झालेल्या आहेत. तसेच खेड आगारास ११ व चिपळूण आगार १९ प्राप्त होणार आहेत. त्यापैकी रत्नागिरीतील २० बसेसचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांचे हस्ते शुक्रवार १७ रोजी रहाटाघर बसस्थानक येथे संपन्न होणार आहे.
रा.प. रत्नागिरी विभागाला प्राप्त झालेल्या ५० वाहनांचा वापर प्रवाशांच्या सोईसाठी सोबत देण्यात आलेल्या मार्गावरील फेऱ्यांकरीता करण्यात येणार आहे. या नवीन बसेसमध्ये खालील सुविधा असणार आहेत. 1) अॅटोमेटिक डोअर सिस्टीम. 2) प्रत्येक आसनाकरीता [सीटकरीता) स्वतंत्र चार्जिंग पॉईंट. 3) पूशबॅक पध्दतीची आसने [सीट ] 4) एफ. डि.एस.एस. [फायर डिटेक्शन अॅण्ड सप्रेशन सिस्टिम) या अद्यावत आग नियंत्रण प्रणालीचा समावेश. 5) एअर सस्पेंशन. 6) पॅनिक बटनाची सुविधा आहे.
सध्या सुरु असलेल्या साध्या बसेसच्या प्रवास भाडयामध्येच म्हणजेच कोणतीही अतिरिक्त भाडेवाढ न करता वरीलप्रमाणे अद्ययावत व अत्याधुनिक सुविधा या वाहनांद्वारे प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.