( रत्नागिरी l प्रतिनिधी)
रत्नागिरीतील प्रथितयश करसल्लागार ऍड. आशिष केळकर यांचे वयाच्या 46 व्या वर्षी मंगळवारी 17 जानेवारी रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
आशिष केळकर यांनी 2000 साली वकिलीचे शिक्षण पूर्ण करून त्यानंतर काही काळ अनुभव घेत त्यांनी स्वत:ची फर्म सुरू केली. तसेच ते पडवेकर फर्मही चालवत होते. रत्नागिरीतील अनेक तज्ञ लोक त्यांचा सल्ला घेत असत.
शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, सोमवार 16 जानेवारी रोजी रात्रीपासून त्यांची प्रकृती बिघडली आणि मंगळवार 17 जानेवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.