महामार्गांवरील अनधिकृत बांधकाम व खोके हटविण्यास आज पासून सुरुवात झाली आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा आमदार उदय सामंत यांनी कॊवीड लसीपेक्षा ही भारी लस महामार्ग च्या अधिकाऱ्यांना टोचल्यावर आजपासून या कामाला सुरुवात झाली आहे.
ना. उदय सामंत यांनी गांभीर्याने लक्ष घालून तीन वेळा पुढे ढकललेल्या या मोहिमेच्या स्वारांना चांगलेच धारेवर धरले होते.
अधिकाऱ्यांकडून या मोहिमेच्या कारवाईला चालढकल केली जात होती. विविध कारणे सांगून कारवाई पुढे ढकलण्यात येत होती. त्यात काही वेळा पोलिस बंदोबस्त उपलब्ध नव्हता तर काही वेळा कोल्हापूरवरून संबंधित महामार्गाचे अधिकारी लक्ष देत नव्हते. तीन वेळा पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला गेला होता. पण आज 12 व 13 तारखेपासून महामार्गावरील ही अतिक्रमण हटवायला सुरुवात झाली आहे.
पण खरा मुद्दा साळवी स्टॉप येथील रस्त्यावर दोन्ही बाजूला 160 च्या वर अनाधिकृत खोके, दुकाने, शेड घातली गेली आहेत.
या ठिकाणी काही स्वतःला राजकीय नेते समजणाऱ्या लोकांचे ही त्यात खोके असून त्यांच्या आशीर्वादाने येथे काही खोके वाटून घेतलेले आहेत. काही भाड्याने दिलेले आहेत, तर काही खोके घालण्यासाठी हजार रुपये घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे असलेले अनधिकृत खोके हटवल्यावर खऱ्या अर्थाने महामार्ग मोकळा होईल.