(रत्नागिरी)
जयेश मंगल कार्यालय, माळनाका येथे 12,13,14 जानेवारी 2024 या तीन दिवसात भव्य अशा ग्राहककेंद्रित गारवा प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. याचा उदघाटन सोहळा पार्लर असोसिएशन व पत्रकार असोसिएशन आणि सौ. शुभांगी जयंत देसाई व श्री. जयंत रघुनाथ देसाई या मान्यवरांच्या हस्ते पार पडला. सकाळपासून ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरीच्या चोखंदळ ग्राहकांसाठी आपल्या आवडीच्या वस्तू हाताळून, पारखून मनपसंत खरेदीचा मनमुराद आनंद या तीन दिवसात घेतला जात आहे.
हे प्रदर्शन रत्नागिरीतल्या महिलांसाठी सौ. अदिती देसाई, सौ. आरती पटवर्धन व सौ. तृप्ती लोध यांनी निव्वळ ग्राहकांच्या खरेदीच्या आनंदासाठी आयोजित केले आहे. व या प्रदर्शनामुळे स्टॉल धारकांचा विक्री संदर्भात नवनवीन कल्पना मिळाल्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे असे त्यांनी आवर्जून दर्शविले आहे.
या प्रदर्शनात नेहमीच्या प्रॉडक्ट व्यतिरिक्त काही हटके प्रॉडक्ट सुद्धा आहेत. जसे सिल्वर कॉटिंग आर्टिकल, हॅन्डमेड पर्सेस, हॅन्डमेड लाकडी खेळणी, ज्वेलरी तर आहेच. याशिवाय लहान मुलांसाठी उपयुक्त असणारे वस्तू चे स्टॉल आहेत. जिभेचे चोचले पुरवणारे, तृप्तीचा ढेकर देणारे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा आहेत. व प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 13 जानेवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत खास छोटया दोस्तासाठी लिटील चॅम्पस रॅम्प वॉक आयोजित केला आहे. 04 ते 10 या वयोगटातील मुले रजिस्टर एन्ट्री सह यात भाग घेऊ शकतात.