(रत्नागिरी)
पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीकरांनी प्रथमच राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवला. तेजतर्रार बैलांच्या जोड्यांच्या धावण्याच्या वेगाचा थरार, शर्यत जिंकण्यासाठी त्या जोड्यांच्या मालकांचा जोरदार आटापिटा आणि शौकिनांच्या गर्दीन जोरदार माहोल बनला होता. या वेगाच्या शर्यतीत राजाराम चव्हाण यांच्या बैलजोडीने ४८ सेंकद २८ पॉईंट इतक्या वेळेत नियोजित अंतर पार करत पहिल्या कमांकाचा मान पटकावला.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रोशन फाळके पुरस्कृत ही पालकमंत्री केसरी बैलगाडा शर्यत स्पर्धा शहरानजीकच्या चंपक मैदानावर झाली. प्रथमच ही स्पर्धा रत्नागिरीत घेण्यात आली होती. या स्पर्धेत ७० स्पर्धक सांगली, सातारा, कोल्हापूरसह रत्नागिरी जिल्ह्यातूनही सहभागी झालेले होते. मंगळवारी दुपारी या स्पर्धेचे उद्घाटन झाले आणि स्पर्धेचा थरार हजारो शौकिनांच्या गर्दीत रंगला.
या स्पर्धेच्या ठिकाणी पालकमंत्री उदय सामंत यांचीही प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हापमुख राहुल पंडित यांच्या हस्ते झाले. त्यावेळी माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके, माजी नगरसेवक विकास पाटील, राजन शेट्ये, विजय खेडेकर, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, वसंत पाटील, या कार्यकमाला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटी आदी उपस्थित होते.
विजेत्या चव्हाण यांना १ लाख रु. रोख आणि मानाची ढाल हिंद केसरी संतोष वेताळ यांच्या हस्ते देण्यात आली. दुसऱ्या क्रमांम नितीन देसाई यांच्या बैलजोडीने (४९ सेकंद ६५ पॉईंट वेळ नोंद) पटकावला. त्यांना पोलीस उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी यांच्याहस्ते ७० हजार रु. पारितोषिक व मानाची ढाल पदान करण्यात आली. तिसऱ्या क्रमांकाची मानकरी सागर अनंत गुरव यांची बैलजोडी (४९ सेकंद ६८ पॉईंट वेळ नोंद) ठरली.